दि.२९.०३.२०१०
प्रति,
आदरणिय, श्री.संभाजीराव जाधव सर,
अभिनंदन!
वर्तमानपत्रातून सुटाच्या पदाधिकारी निवडणूकीत सुटा
पुरस्कृत ऊमेदवार निवडून आल्याचे कळाले.त्याबद्दल सुटाच्या या ऊमेदवारांचे व
त्यांना निवडून आणण्यासाठी कष्ट घेतलेल्या आपल्यासारख्या धुरिणांचेही अभिनंदन.
मद्यंतरी दूर्दैवाने काही वाद ऊफाळले.पण शिक्षक व शिक्षकेतरांचे म्हणजे एकूनच
शिक्षणाचे प्रश्न यशस्वीपणे हाताळून लोकांचे आणि पर्यायाने समाजाचेच भले करू
पाहणाऱया, सुटाच्या स्थापनेपासून धडपडनाऱया आपणासारख्यांचे मुलभूत कामच शेवटी टिकणारे
होते, अक्षय होते.त्यालाच- आपल्या कार्यालाच पोचपावती मिळाली हे पाहून आनंद तर
झालाच पण कामाची दिशा आणि ते काम करतानाची निस्पृह वृत्ती दिपस्तंभासारखा इतरांना
सतत मार्गदर्शन करित राहील हे निश्चीत.
शिक्षक व शिक्षकेतरांचे प्रश्न सोडवताना, भ्रष्ट
संस्थाचालकांना अनेकदा बेडरपणे अंगावर घ्यावे लागले.त्यातला आपला बाणेदारपणा आम्ही
अनुभवला आहे.हजार लटपटी-खटपटी करून संस्थाचालकांनी भंडावून सोडण्याची शक्यता
असूनही स्वच्छ चारित्र्याच्या जोरावर आपण दिलेले नेतृत्व स्तिमित करणारे
आहे.सगळीकडे चळवळींचा अस्ताकडचा प्रवास घडत असतानाच्या या काळात चळवळींना आपण
दिलेले बळ स्पृहणीय आहे.चळवळी टिकवून त्या चालवण्यातले आपले योगदान श्रेष्ठत्वाची
प्रचीती देणारे आहे.
आमच्या
डोळ्यांसमोर आपले हे कार्य सतत अंजनाचे कार्य करित राहो हीच इच्छा.