गुरुवार, मार्च ३१, २०११

बीबीसी रेडीयो

“ये बीबीसी की हिंदी सेवा है ”। असा उद्घोष करीत सुरू होणारी रेडीयो प्रसारण सेवा जगभरातल्या घडामोडी त्यातल्या खाचाखोचांसकट आणि निपक्षपातीपणे आपल्यापर्यंत पोहोचवत आली. केवळ एक तासाच्या या कार्यक्रमात अनेक विषयांचे वृत्तांत, विश्लेशन, प्रत्यक्ष मुलाखती आणि जगभरात या घडामोडींचा होऊ शकणारा परिणाम या संबंधीचे भाष्य ही बीबीसी हिंदी ची ओळख ठरत आली.विश्वासार्हतेत इतर कोणत्याही माध्यमापेक्षा बीबीसीला आजही प्राधान्य दिले जाते, ते वर्षानुवर्षे अव्याहतपणे प्रसारणाचा दर्जा सतत उंचावत ठेवल्यामुळेच. इंदिरा गांधींचा खून असो, राजीव गांधींची स्फेटात केली गेलेली हत्या असो, बांगलादेश चे युद्ध वा अलिकडील दांतेवाडातील नक्षलवाद्यांचा हैदोस असो, निव्वळ घटना सांगून न थांबता पार्श्वभुमी, वस्तूस्थिती आणि परिणाम यांनी या घटनेबाबतची इत्यंभूत माहिती लक्षात आणून देणं हे जणू या रेडियोने आपलं कर्त्यव्यच मानलं. चिन मधल्या थेन- आन –मेन चौकात स्वातंत्र्य आणि लोकशाही यांची मागणी करणाऱया लाखो युवकांवर चिनच्या कम्युनिस्ट राजवटीने रणगाडे चालविले त्यावेळी जीव वाचवण्यासाठी विजेच्या खांबावर चढणाऱया युवकाचे वर्णन, समोरून रणगाडे चालून येत असतानासुद्धा हात पसरून खंबीरपणे ऊभा राहणारा युवक, इराक युद्धाचा निर्णय घेतल्यावर प्रेसिडेन्ट बुश यांनी दिवसभरातला त्यानंतरचा उर्वरित वेळ चर्च च्या धर्मगुरूंसमवेत व्यतित केला हे निरिक्षण किवा दांतेवाडा च्या ऐन धामधुमीच्या काळात रमणसिंगांची अर्धातास प्रसारित केलेली नक्षलवादाच्या मुळाशी जाणारी महत्वाची मुलाखत, यांनी आपल्या जाणिवाच प्रगल्भ केल्या आहेत
म्हणूनच, जेव्हा ३१ मार्च पासून या रेडियोचं प्रसारण बंद होणार हे समजल्यावर जगभरातल्या या रेडियोच्या श्रोत्यांनी त्यास कडाडून विरोध केला.अनेक नामवंत व्यक्तिंनी मदत निधी चा प्रस्ताव ठेवला, काहीही करून या रेडियोचं प्रसारण सुरू ठेवण्यासाठी ब्रिटीश सरकारला गळ घातली. या सगळ्या प्रयत्नांना य़श येवून किमान आणखी एक वर्ष त्यास मुदतवाढ मिळाली.
दरम्यानच्या काळात सर्व पर्यायांची उपयुक्तता व व्यवहार्यता तपासून बघीतली जाणार आहे.

पी. ए. पाटील, जयसिंगपूर
Praspatil_10@rediffmail.com

जिवणवाहिनी

जिवणवाहिनी
जयसिंगपूरमधून जाणारा कोल्हापूर सांगली रस्ता वाढलेल्या वाहनांच्या वर्दळीस अपुरा पडतो. राज्यातला महत्वाचा व रस्त्यावरील वाहनांच्या संख्येनुसार ऊच्च वारंवारता असलेला हा रस्ता आहे. अपुरा रस्ता व वाहनांची वर्दळ यामुळे या रस्त्यावरील अपघातांची संख्या जास्त आहे.त्यात जीव दगावलेल्यांची संख्या ९८ टक्के आहे.गेली अनेक वर्षे अपघात व मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या वेगाने वाढतेच आहे.या रस्त्यावरून प्रवास करणाऱया प्रत्येकाला व त्याच्या कुटूंबाला याची जाणीव होते.दुसरा पर्याय नाही म्हणून नाविलाजाने जीव मुठीत धरून रोज या रस्त्याने लाखो लोकांना प्रवास करावा लागत आहे. माणसाने आपल्या सोयीसाठी रस्ते बनविले.वाहतुकीस अडथळा येत असेल, कधीकाळी त्यावेळच्या गरजेनुसार रस्ता बनविला असेल व सध्या तो अपुरा पडत असेल व सर्वात महत्वाचे – माणसाच्या सोयीसाठी बनविलेल्या रस्त्यावर सततच्या अपघातात माणसांचेच मृत्यू घडत असतील तर तो रस्ता प्रवासास अयोग्य समजायला हवा.
अशा परिस्थितीत कोल्हापूर व सांगली या दाट लोकसंख्येने परस्परांना जोडलेल्या जिल्ह्यांची ही जीवनवाहीनी अद्याप दु्र्लक्षीत राहीली आहे.मजले खिंडीतून परस्पर सांगलीस जाणारा (अंकली पुलाजवळ मुख्य मार्गास मिळणारा) रस्ता हा जयसिंगपूरमधून जाणाऱया रस्त्यास पर्याय ठरू शकत नाही.सध्याही त्यामार्गे वाहतूक सुरूच आहे. पण म्हणून मुख्य मार्गावरचा ताण कमी झालेला नाही,व अपघातही कमी झालेले नाहीत.
वाढणारी लोकसंख्या, रोजच वसणाऱया नविण वसाहती, विस्तारणारी नगरं व सध्याच्या संख्येत नव्याने पडणारी वाहणांची भर हे, तसेच भविष्यातील लोकसंख्या,नगरं, वाहनं, औद्योगिक वसाहती, कार्यालये,शाळा-महाविद्यालये,बाजारपेठा यांचा पुढील २०-३० (किंबहूना५०) वर्षांचा विचार करता कोल्हापूर सांगली व्हाया जयसिंगपूर हा मार्ग चौपदरी नव्हे तर सहापदरी होणे गरजेचे आहे.पण इतका लांब पल्ल्याचा विचार करून नियोजन करणे आपल्यासारख्या इन्स्टंट लोकांना पेलवत नाही, आणि पदोपदी ऊल्लेख व ऊदाहरणे मात्र परदेशी विकासाची आपणच देत असतो.त्यादृष्टीने मजले खिंडीतून सांगलीस जोडणारा रस्ता दुपदरी व कोल्हापूर – सांगली (व्हाया जयसिंगपूर) मुख्य मार्ग चौपदरी करावा.
जयसिंगपूरातील मुठभरांनी सुरू केलेला राजकीय वा वैयक्तिक विरोध थाबायला हवा. भविष्याचा वेध घेवूनच ही नगरी वसली.आताही तशाच दूरदृष्टीची गरज आहे, हे आपण ओळखायला हवे. शेवटी हा रस्ता दोन जिल्ह्यांना तर जोडतोच पण त्याहून महत्वाचे कोकणाला ऊर्वरीत महाराष्ट्राशी थेट व जवळच्या मार्गाने जोडतो.त्यामुळे चार-दोन लोकांचा विरोध डावलून प्रसंगी खांबावरील उड्डाणपूल बांधून ही जिवनवाहिनी जिवंत व खळाळती ठेवायला हवी. पी. ए. पाटील. जयसिंगपूर.

मुलांना सुट्टी उपभोगू द्या !

हल्ली अशी टूम आली आहे की, नववी, दहावी झाली की एप्रिलपासूनच दहावी, अकरावी चे तास चालू. मुलांना सुट्टी नाहीच. आधीच पेपर,परिक्षा, अभ्यास यांमुळे मुलांवर ताण असतो.ताणामुळे अविचारी मुले आत्महत्या करण्यास प्रवृत्त होत आहेत. बाकीची मुले कसल्यातरी ओझ्याखाली दबल्यासारखी दिसतात.
शाळांनी परिक्षा संपल्यानंतर मुलांना सुट्टी द्यावी. सुट्टीच्या कालावधीत मुले मोकळ्या वातावरणात दोन महिने राहतील. पालकांनी लक्ष ठेवून त्यांना मोकळीक द्यावी. हिंडू फिरू द्यावे. मुले थोडी छंदी-फंदी झाली तर बिघडत नाही. हा वेळ त्यांची जून ते एप्रिल मध्ये झालेली झीज भरून काढेल. मुले नव्या जोमाने नव्या वर्गात जातील, तेव्हाच वर्गात त्यांचे लक्ष लागेल, शिक्षणात रस निर्माण होईल.
मुलांची हक्काची सुट्टी त्यांना ऊपभोगू द्यावी. जून ते मार्च या कालावधित वेळेचे नियोजन करून अभ्यासक्रम पु्र्ण कऱता येईल. त्यासाठी सुट्टीत शाळा ठेवू नये. शिक्षक ही सुट्टीतील विश्रातीं नंतऱ नविन वर्ग चांगल्या पदधतीने शिकवतील. या बाबत सुज्ञ पालकांनी व शाळांनीही विचार करावा असे मला वाटते. त्यासाठी मुलांवर जबरदस्ती करू नये.
आनंदी शिक्षणाचा मुळ हेतू साध्य करायचा असेल तर विद्यार्थि केंद्रविंदू मानून शिक्षणाचे नियोजन व्हायला हवे. आनंदी शिक्षण म्हणजे आनंदी विद्यार्थ्याचे शिक्षण. मुलांची स्वतःची प्रतिभा जागृत ठेवायची असेल तर सुट्टीतून मिळनारा ताजेपणा जपायला हवा. शाळेतून बाहेर पडनारी मुले आनंदी असतात हे आपण पाहतो. उद्या शाळेला सुट्टी आहे ही सुचना ऐकल्यावर मुलांचा जल्लोषही पाहण्यासारखा असतो. यातून आपण काही शिकनार आहोत की नाही हा खरा प्रश्न आहे. शाळा-शाळांमधली स्पर्धा आणि पालका-पालकांमधली स्पर्धा मुलांच्यादृष्टीने जिवघेनी ठरल्यास नवल कसले?
सुवर्णा पाटील, जयसिंगपूर.
suvarnap29@rediffmail.com

फिल्मसोसायटी

‘To sir with love’ हा १९६७ चा नितांत सुदंर चिञपट खुप दिवसानी परत पाहण्याचा योग जयसिंगपुरच्या Film Society च्या निमित्ताने आला. दुर्मिळ आणि मुख्य प्रवाहातून सहसा न दिसणाऱया क्लासिक चिञपटांचा आनंद मिळवण्यासाठी Film Society खुपच उपयुक्त ठरते. देश विदेशातील उत्तमोत्तम आशयघन चि़ञपट पहायला मिळणे हि मेजवाणीच असते.विविध विषयांवर, सामाजिक समस्यांवर, भाष्य करणे हा खरे तर चिञपट माध्यमांचा खरा हेतु. ‘बायसिकल थिप’ सारखा चिञपट जगभरातील संवेदनशिल लोकांना हेलावुन टाकण्याचे सामर्थ्य बाळगतो, ते त्यातल्या आशयघनतेमुळेच. आजकालच्या गल्लाभरु चिञपटांच्या भाउगर्दीत आशयघन तर सोडाच पण निखळ मनोरंजन करणारे चिञपट ही दुर्मिळ होण्याच्या काळात, असा एखादा योग हा त्या माध्यमांची ताकद दाखवुन जातो. माञ तितकी ताकद असणारे दिग्दर्शक आणि पूर्ण चित्रपटभर २ ते ३ तास त्या भुमिकेचं बेअरिंग सांभाळणारे अभिनेते जिथे दु्र्मिळ झालेत तिथे अशा चिञपटांचे प्रदर्शन करणाऱया संस्था ही दुर्मिळ, आणि म्हणुनच फिल्मसोसायटी जयसिंगपूरचे अभिनंदन.
पी. ए. पाटील, जयसिंगपूर

बुरखा

बुरखा
बुरखा सार्वजनिक ठिकाणी वापरण्यावर फ्रान्समध्ये बंदी करणारा वटहुकूम निघतो आहे. जोखडातून बाहेर पडण्यासाठी अशा कायद्यांचा वापर सुधारणांचा प्रेरक म्हणून केला तर तो ऊपयोगी ठरतो. दमण मग ते कोणत्याही स्वरूपातील असो, ते भितीपोटी एकाने दुसऱयाच्या स्वातंत्र्यावर, मोकळेपणावर केलेले अतिक्रमणच असते.स्त्रियांनी बुरखा वापरणे ही मध्ययुगीन मानसिकता आहे. जाचक अटींना धर्माची, परंपरेची झालर लावून आपले स्वार्थी हेतू साध्य करून घेण्यात पुरूषी वृत्तीची हुकमत राखण्याचा प्रयत्न आहे. स्त्रियांना आत्मसन्मानाची जाणीवच होऊ द्यायची नाही या भुमिकेतून बुरखा सक्तिचा करण्यात आला. बुरखा आणि धर्म यांचा कोणताही संबंध नाही. कोणताच धर्म मुलतः दमण आणि गुलामी यांना थारा देत नाही. सुधारणेचे वारे लागले तर स्त्रिया शिक्षित होतील, त्यानिमित्ताने समाजात विचारांचे आदानप्रदान होईल, आत्मसन्मान जागा होईल, आई शिक्षीत झाली तर मुले आणि घरदार शहाणे होईल या मानसिकतेतून बुरख्याची प्रथा अस्तित्वात आली.शिक्षणाच्या मुळ प्रचारकालाच अशा रितीने कह्यात ठेवले तर अशा समाजाला आपण म्हणू त्या मार्गाने नेता येईल.आपले जगावर राज्य करण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी गुलामी मानसिकतेची सेना हाकारणे शक्य होईल, या विचाराने भारित होण्याच्या काळात बुरखा हे साधन म्हणून अस्तित्वात आले. मग याला धर्म-परंपरा याचा पगडा असलेल्या समाजात सक्तिच्या स्वरूपात अंमलात आणले गेले. नव विचारांचा, शिक्षणाचा, सुधारणेचा खळाळता प्रवाह रोखण्यात या बुरख्याने जी मेख मारली तिने या समाजाला इतर समाजांच्या तुलनेत मागास राखण्यात महत्वाची भुमिका बजावली.केवळ धार्मिक वचनांची घोकंपट्टी म्हणजेच शिक्षण असे शिकवणारे आणखी काहीबाही शिकवत राहीले, आणि मग सगळी दिशाच उलटी झाली.हे चुकीचे आहे असे सांगणारे प्रबोधनाचा मार्ग अनुसरणारे मध्येच गायब होत राहीले. सन्मार्गाची दिशा दाखविणारे संत आणि वाईट-खोट्या-धर्मांध गोष्टींना विरोध करून समाजमन जागृत करणारे समाजसुधारक यांची वानवा झाली. शिडावर मार्गक्रमण करणारे जहाज आजूबाजूचा वारा भरून घेण्यात असमर्थ ठरत असेल तर दिशाहीन होते.नेमके तेच झाले.यातून बाहेर पडायचे झाल्यास मोकळेपणाचे सुधारकी वारे शिडात भरून घ्यावयास हवे.

श्री. पी. ए. पाटील, जयसिंगपूर
Praspatil_10@rediffmail.com

ग्रंथप्रामाण्याची कालसापेक्षता ...मूलगूनाचे बदलते संदर्भ

ग्रंथप्रामाण्याची कालसापेक्षता ...मूलगूनाचे बदलते संदर्भ सगळ्याच तीर्थंकरांचा उपदेश एकसारखाच असेल का...