बुधवार, जून ०१, २०२२

आतिथ्यशिल शेतकऱ्याचं दुसरं रूप

 

               आतिथ्यशिल शेतकऱ्याचं दुसरं रूप

ऊस दर आंदोलनाबाबत समिक्षणे व परिक्षणे यातून पद्धतशीर अभ्यासू विवेचन होणे गरजेचे आहेच,तथापी आंदोलन हिंसक झाल्याचा सगळा दोष शेतकरीवर्गावर(आंदोलकांवर) करणे गैर आहे.आरोप प्रत्यारोपांची आतषबाजी राजकीय पुढाऱ्यांकडून चालू राहील ती चालू द्यावी. मात्र आंदोलकांना रस्त्यावर का उतरावे लागते इथपासून,आंदोलन संपल्यानंतर त्याचे होणारे परिणाम असा व्यापक अभ्यास व्हावयास हवा... ऊस हे नगदी पीक घेण्याकडे वाढलेला कल लक्षात घेउन त्यासंबंधी राजकारण करत कारखाणदारी ऊदयास आली. सुरूवातीच्या काळात खाण्यात बेसुमारी नव्हती. पण सहकाराचं हे सुपिक कुरण जाणत्यांच्या चांगलेच नजरेत भरले. मग सहकारी कारखाने लक्ष करून त्यामाध्यमातूनच राजकारण केले जाउ लागले. असे करत करत कारखाने हे राजकारनाचे अड्डेच होऊन गेले, इतके की राज्याच्या सत्तेचे ते प्रवेशद्वारच झाले. ऊसाच्या वजणात काटा मारणे, रिकव्हरी कमी दाखवणे,असे अनेक मार्ग चोखाळत राजकीय संचालकांनी कारखाण्याच्या माध्यमातून स्वतःचेच खिसे भरले. शेतकऱ्याला याचा पत्ता लागायला अनेक वर्षे गेली. जाणीव झाल्यानंतरसुद्धा एकमुखी प्रामाणिक नेतृत्व नव्हतं. नंतरच्या काळात ते ऊदयास आले. ऊस कारखानदारीचा, ऊत्पादकाच्या दृष्टीकोनातून अभ्यास होऊ लागला. आपण नागवले जातोय हे लक्षात येईल तसे शेतकरी जागा झाला, दरासाठी रस्त्यावर ऊतरू लागला. संयमी आणि आतिथ्यशिल शेतकऱ्याचं दुसरं रूप भल्याभल्यांना चक्रावून गेलं. राजकारणी पुढाऱ्यांच्या वर्षानुवर्षांच्या गुळचट थापांना कंटाळलेला आणि निर्लज्ज्य व्यवस्थेने पिळलेला शेतकरी आक्रमक झाला. त्यानं आंदोलन हातात घेतलं.योग्य तिथे चर्चा-तडजोड करून ते यशस्वी करून दाखवलं. राजकारणी आणि कारखाणदार अस्वस्थ झाले. डाव आपल्या हातातून निसटतोय याची जाणीव त्यांना झाली. योजना आखून आंदोलन मोडण्याचा व ते बदनाम करण्यासाठी हुसकावण्याच्या अघोरी डावाची मांडणी केली. सत्ता होतीच सोबतीला. नेत्यांना काहीतरी कारण दाखवून अटक करणे, कारखाणदारांना हाताशी धरणे, शेतकऱ्यावर गोळ्या झाडणे आणि वर आंदोलनाचीच हिंसक म्हणून संभावना करणे,उमटलेल्या प्रतिक्रियांचं भांडवल करून गावागावातील शेतकऱ्यांच्या पोरांवर खटले भरणे अशी सगळी दडपशाही वर्षानुवर्षे राजकारणात मुरलेल्या शुक्राचार्यांनी व्यवस्थित केली. यांच्या गुडांनी राजू शेट्टींना जवळजवळ जिवे मारलेच होते. राजकारणी व साखर कारखाणदार यांच्याविरूद्ध दंड थोपटून शेतकऱयाला त्याच्या पिकाचे दाम मिळवून देणाऱया शेट्टींना दत्ता सामंत म्हणणे म्हणजे अकलेचे दिवाळे वाजल्याचे लक्षण आहे. सत्ताधाऱयांविरोधात लढणाऱयांची गत कशी केली जाते याचा काहीच ईतिहास माहिती नसला किंवा माहिती करून घ्यायचा नसला की राजकारण्यांचीच री ओढली जाते.  इथेपर्यंत हा डाव यशस्वी झाल्यासारखा दिसतोय. सुप्तावस्थेत याचे परिणाम कसे होतात याचा मागोवा घेणे हे राजकीय आणि सामाजिक अभ्यासकांना आव्हाण ठरणार आहे. अलिकडे जगभरात, प्रस्थापित सत्तांविरोधात आंदोलने झाली, ती चिरडण्याचा प्रयत्न करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना परागंदा व्हावे लागले हा ईतिहास डोळ्यांसमोर आहे.आपल्याकडची मंडळी राजकीय शहाणपन दाखवणार काय हा खरा प्रश्न आहे.                  

ग्रंथप्रामाण्याची कालसापेक्षता ...मूलगूनाचे बदलते संदर्भ

ग्रंथप्रामाण्याची कालसापेक्षता ...मूलगूनाचे बदलते संदर्भ सगळ्याच तीर्थंकरांचा उपदेश एकसारखाच असेल का...