बुधवार, सप्टेंबर १३, २०२३

अणूवीजप्रकल्प।.... अणूबाँब नव्हे.

                                                   अणूवीजप्रकल्प।.... अणूबाँब नव्हे.         

जैतापूरचे आंदोलन व त्याचा राजकिय पक्षांनी उठवलेला फायदा, कुडनकुलम बाबत सर्वोच्य न्यायालयाचा निवाडा या पार्श्वभुमिवर अणुवीजप्रकल्पांबाबत निकोप दृष्टी ठेवण्याची गरज र्माण झाली आहे.जगभरात किमान ३२ देशांमध्ये अणूवीज प्रकल्प कार्यरत आहेत.सगळ्या प्रकल्पानी मिळून आत्तापर्यंत जवळपास १४०० वर्षे काम केले आहे.पैकी चेर्नोबीलचा अपवाद सोडल्यास अणूप्रकल्पातील वा समाजातील व्यक्ति किरणोत्सर्गाच्या बळी ठरल्या नाहीत. गेल्या ५० वर्षात नोंदघेण्याजोग्या तीन घटना (पैकी एक अपघात) घडल्या आहेत.(१)थ्री माईल आयलंड- (अमेरिका-१९७९)- एकही मृत्यू नाही किंवा जाणवण्याजोगे शारिरिक वा पर्यावरणीय परिणाम झाले नाहीत.  (२)चेर्नोबील-(रशिया-१९८६)- गंभीर घटना, मृतांची एकूण संख्या ५६. (३) फुकूशिमा-(जपान-२०११)- कोणीही मृत्यूमुखी नाही. आत्तापर्यंत भुकंप झाल्यानंतर स्वयंचलितपणे जगभरातले अणूवीज प्रकल्प बंद झालेले आहेत.जपानमध्येही असेच घडले.तिथे मृत्यूमुखी पडलेली संख्या वा दिसलेले नुकसान हे भुकंप व सुनामिमुळे झाले आहे.अणूवीजप्रकल्पामुळे नाही. दररोजचे रस्त्यावरील अपघात, कुपोषण, आत्महत्या, राजकीय हिंसाचार, जातीय दंगली, गल्लोगल्ली तलवारी-कोयत्याने पडणारे खून, कौटूंबीक हत्या, स्त्रीभूण हत्या या सगळ्यांनी मृत्यूमुखी पडणाऱयांची एकूण बेरीज,  आणि गेल्या ५० वर्षात ३२ देशांमधील शेकडो प्रकल्पात मिळून केवळ ५६ लोक मृत झालेत, हे वास्तव आपण स्विकारणार आहोत की नाही?.अणूप्रकल्प विरोधी समिती असे नावातच निव्वळ विरोध असणाऱया समित्या फक्त विरोधासाठीच जन्मतात असे खेदाने म्हणावे वाटते.शेवटी व्यावसायिक तत्वावरील अणूवीजप्रकल्प हे अणू वर चालणारे विद्युत निर्मिती केंद्र आहे, हे काही अणूबाँब नव्हे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. मच्छीमारी वर परिणाम होईल किंवा कोकणचा निसर्ग नामशेष होईल असे पसरवणाऱयांचा पूर्वेतिहास सुज्ञपणे तपासून घेणे महत्वाचे ठरणार आहे. प्रकल्पाना विरोध करायचा आणि बेकारी विरूद्ध रूदन करायचे...विजप्रकल्पांना समुद्रात बुडवायचे आणि विजकपातीविरूद्ध निदर्शने करायची...संसदेत चर्चा करायची नाही आणि बाहेर मात्र राजीनामे मागत पत्रकार परिषदा घ्यायच्या हे सर्वंकष विवेकाला तिलांजली देणारे ठरते आहे.याची जाणिव नसणे हे मात्र आत्मघाती ठरेल.  

                        पी. ए. पाटील, जयसिंगपूर.         

                        papatils@gmail.com    

ग्रंथप्रामाण्याची कालसापेक्षता ...मूलगूनाचे बदलते संदर्भ

ग्रंथप्रामाण्याची कालसापेक्षता ...मूलगूनाचे बदलते संदर्भ सगळ्याच तीर्थंकरांचा उपदेश एकसारखाच असेल का...