मंदिरांची एकूण संख्या आणि चाललेले महोत्सव, पूजा, विधि यांची वारंवारता वाढली आहे. मंदिर बांधने, मुर्ती बसवने, त्याचा ऊत्सव करने यासाठी खपनाऱया लोकांची संख्या वाढली आहे. धार्मिकतेच्या उत्सवाची प्रेरणा वाढू लागली आहे. गावागावात मंदिरे वाढली. मुर्तींची प्रतिष्ठापना झाली. ऊत्सव होउ लागले. पूजांचे सोहळे तर गर्दिने फुलू लागले. गावोगावी होनाऱया जत्रा-यात्रा मधून लांबून येउन हजेरी लावून जानाऱयांची संख्या आणि निष्ठा अचंबीत करू लागली.
सर्वसाधारणपने एका गावात एका समाजाचे एकच मंदिर असावे. तसे ते बऱयाचदा असतेही. काही वर्षापूर्वीपर्यंत हे पथ्य पाळले गेले. ऊत्सवांच्या, भजन – किर्तनांच्या, पूजा-विधींच्या निमित्ताने, धार्मिक कार्यांच्या ओढीने सारा समाज एकत्र यायचा. ऊत्साहाने कार्यक्रम पार पडायचे.
काळानुरूप ही सगळीच प्रक्रिया बदलत चालली आहे.धार्मिकता लोपू लागली, एकत्रीत येऊन उत्सव साजरे करण्यापेक्षा गटा-तटाची उर्मी जोर धरु लागली, माझ्या गटाला महत्व दिले जात नाही. आम्हाला कोणी विचारत नाही. आमची कोणीच दाद घेत नाही, अशाप्रकारचा प्रतीष्ठा, अहंकार, व स्वाभिमान वाढू लागला. मग एक मंदिर असूनही दुसऱया,तिसऱया,चवथ्या मंदिराची गरज वाटू लागली.त्यात एक मंदिर असताना दुसरे मंदिर नको म्हणने जड जाऊ लागले - कारण धर्मश्रद्धेचा बाऊ केला गेला. जुने मंदिर लांब पडते,जाणे होत नाही अशा कारणांची झालर मिळाली. विवेक आणि श्रद्धा अशा तिड्यात सारासार विचार मागे पडतो. नेमके तेच झाले.
मंदिरांची संख्या वाढली. धार्मिकतेच्या नावाखाली एकसंध समाज गटा-तटात विखुरला गेला. प्रत्येकाचे स्वतःचे संस्थान झाले. वेगळे विचार पटेनासे झाले.उलट सुलट विचारांची घुसळन थांबली. आमचे ते सर्वोत्कृष्ट हे सांगण्याचा आटापिटा वाढला.चिंतनाला फाटा मिळाला. धार्मिक पूजा विधी पंचकल्याण, अभिषेक यांच्या निमित्ताने विचारप्रवन भाषणांची परंपरा खंडीत झाली. आणि उरले ते उत्सव. तसा आपला समाज उत्सवप्रियच जास्त.दणदणीत मिरवणूक, मोटर सायकल फेरी, हत्तीवरून मिरवणूक, डॉल्बीचा दणदणाट,हेलिकॉप्टरमधून पुष्पपवृष्टी या धर्मबाह्य गोष्टींचा प्रभाव वाढला. पैशाचा स्त्रोत अशा अनुत्पादक आणि प्रदर्शनिय मार्गांकडे वळवला गेला. हे सर्व जाणूनबूजून झाले नसेलही कदाचित, पण ज्या कार्यसंस्कृतितून हे घडत गेले ते तपासून बघण्याची गरज कोणालाच कशी वाटली नाही हा सलणारा प्रश्न निर्माण होतो.त्याचे ऊत्तर दिले गेले पाहिजे.प्रत्येक समाजाची एक केंद्रिय सभा असते.आणि प्रादेशिक समितीही असते.यांचाही या सर्व घडामोडींना पाठींबाच राहिला.आणि मग सारे रानच मोकळे मिळाले.त्यात मोफत जेवनावळींची भर पडली.ज्यांना दोनवेळच्या जेवनाची अजिबात भ्रांत नाही अशांसाठी मिष्टान्न भोजनाची सोय केली गेली.
या सर्व गोष्टी जे रोखू शकत होते त्यांनी धाडस दाखविले नाही. मुनी,साधू वर्ग मौन राहीला. इतके कलश आणि अशी अशी कर्मकांडे यातच धर्म अडकून राहिला. प्रसंगी समाजाला खडसावन्याच्या मुलभूत कर्तव्यात प्रसारक-मार्गदर्शक अकार्यक्षम ठरले. आणि तेही गर्दितलेच एक होऊन गेले.विचारांची झळाळी गेली, काळानुरूप समाजाच्या ऊन्नतीला मार्गदर्शन करण्याचे त्याला भरकटू न देण्याचे मौलिक कार्य केले गेलेच नाही.मंदिर, मुर्ति, पर्तिष्ठापना, पंचकल्याण, राजे-रजवाडे, छप्पन कुमारिका आणि निर्वाण लाडू, पंचरसांचा अभिषेक आणि हत्ती घोडे यातच सगळी धार्मिकता सामावल्याचा आभास ऊभा राहिला.
धार्मिकता ही अत्यंत सहज गोष्ट आहे. कोणताही अट्टाहास ही धार्मिकता नव्हेच. भाव तोची देव, मानवसेवा हीच ईश्वर सेवा, जिथे राबती हात तिथे हरी, मानवतेचे मंदिर माझे,अशाप्रकारे सगळ्याच संत-महंतांनी धर्माची आणि मानवतेची, धर्माची आणि कष्टाची सांगड घातली आहे. सगळे आजचे देव हे खरे तर त्या-त्या काळातील कु-रूढी कु-परंपरा व पिळवणूक यांच्याविरोधात बंड करून तो प्रवाह स्वच्छ करणारे क्रांतिकारक होते.त्यांचा देव करून त्यांना मदिरात कोंडल्यामुळे मानसांपासून त्यांना दूर ठेवले गेले.कष्ट आणि सेवा यांची धार्मिकतेपासून फारकत झाली.मंदिरांच्या पुजाऱयांना अवास्तव महत्व आले.पुजारी चलाख झाले.अडलेल्या नडलेल्याचा अंदाज घेवून माया जमवन्याचे तंत्र त्यांना ऊत्तम साधले.
जिवनाची गती वाढली, स्पर्धा वाढली, एकत्र कुटूंबे विभक्त झाली.कामानिमित्ताने फारकत झाली.मानसे कोषात राहू लागली.मी-माझे महत्वाचे वाटू लागले.सार्वजनिक जिवनात कामाचा आणि बिनकामाचाही ताण वाढला.संस्कारांची मुळं खिळखिळी होऊ लागली.अव्यापारेषू व्यापार वाढला.कमी कष्टात कमी वेळात अधिकाधिक मिळवण्याचे वेध लागले.नितिमत्ता ढासळू लागली.गैरमार्ग अवलंबने नविण राहिले नाही.मग मन खाउ लागले.
यावर ऊपाय म्हणून देव, देवर्षि, बाबा पुजारी, स्वामी, महाराज, यांचे ऊंबरठे ओळखिचे झाले.यांनी सांगीतले म्हणून माणसे सगळे काही करित गेली, त्यात अडकली.अनेकप्रकारच्या कर्मकांडांना महत्व आले.अर्थहिन पंक्ति गाड्यांच्या काचावर मागे पुढे ठळकपणे लिहिल्या गेल्या.मंदिरांची संख्या तर वाढलीच, पण धार्मिकतेचा काल्पनिक फुगा प्रचंड फुगला.अनैतिकतेला ऊधाण आले.धर्माच्या नावावर संघटना उभ्या राहिल्या. धार्मिक दादागिरी वाढली.आणि चौकाचौकात मंदिरांची व मुर्तिंची प्रतिष्ठापना एकेका रात्रीतच होऊ लागली.दुसऱयाचे हित जपनाऱया देवांनीही अतिक्रमनातील जागेत छान बस्तान बसवले.
दारूड्याला अन्नापेक्षाही जशी दारू अधिक प्रिय तशी आम्हाला प्रत्यक्ष धार्मिकतेपेक्षा (मानवतेपेक्षा) धार्मिकतेची नशा अधिक प्रिय झाली.साऱया विश्वात भरून राहीलेलं च्यैतन्य जेव्हा मंदिर, मशिद, चर्च अशा चौकटीत बंद करतो तेव्हा आपण देवत्वाच्या म्हणजेच लोककल्याणासाठी झटनाऱया अलौकिक व्यक्तिमत्वाच्या, मुळ कल्पनेपासून दूर जातो.जिवनाच्या हरतऱहेच्या क्षेत्रात ऊत्तुंग प्रतिभेची जी माणसे होऊन गेली त्यांना प्रथम या चौकटी मोडाव्या लागल्या आणि खरे रूप मांडावे लागले.समाजाच्या हितासाठी, शुद्ध धार्मिकतेचा प्रवाह खळाळता ठेवण्यासाठी त्यांनाही संघर्ष करावा लागला.त्यांनी तो केला.त्याची किंमतही त्यांनी चुकविली.पण ते मागे सरले नाहीत.चमकदार गोष्टींची भूल पडली की माणूस समतोल बुद्धी हरवून बसतो. ही जुनी सवय आहे.ही सवय आपण सोडत नाही तोवर कबिराच्या दोह्यातला ,
घर से मंदिर/मश्जीद है बहुत दूर,
चलो यूँ कर ले –
किसी रोते हुए बच्चे को हँसाया जाए !
असा साधा सोपा आणि सरळ धर्म अंगिकारणे अवघड होऊन बसणार आहे.
श्री. पी. ए. पाटील, जयसिंगपूर
praspatil_10@rediffmail.com
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)
ग्रंथप्रामाण्याची कालसापेक्षता ...मूलगूनाचे बदलते संदर्भ
ग्रंथप्रामाण्याची कालसापेक्षता ...मूलगूनाचे बदलते संदर्भ सगळ्याच तीर्थंकरांचा उपदेश एकसारखाच असेल का...
-
सृजनशक्ती साहित्य विचार मंच चिंचवाड व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई आयोजित, १४ वे ग्रामीण युवा मराठी साहि...
-
चार्वाक – एक ओळख चार्वाक! भारताच्या सामाजिक ईतिहासातील विज्ञाननिष्ठ, विवेक प्रा...