कुटूंबप्रमुख
दहावी बारावी तसेच सीईटी, एआयईईईया परिक्षांचा निकाल नुकताच
जाहीर झाला. दहावी बारावी करून तंत्रनिकेतने व अभियांत्रिकी मध्ये प्रवेश घेण्याची
ओढ वाढते आहे.उदार आर्थिक धोरण व खुलेपणा यामुळे व्यापाराच्या संधी
वाढल्या.लोकसंख्या व वाढणाऱया बाजारपेठेमुळे निर्माण, व्यापार व सेवा ऊद्योगात
कुशल मनुष्यबळाची वाढती गरज लक्षात घेउन तंत्रशिक्षणसंस्थाचे पेव फुटले.अचानकपणे
नव्याने भरपूर संस्था सुरू झाल्यामुळे प्रशिक्षीत व अनुभवी प्राध्यापकांची उणीव
भासते. ही उणीव भरून काढण्यासाठी संस्था चकचकीत ईमारती, आकर्षक जाहिराती,मोठाले डीजीटल
फलक व अर्थहिन शब्दांच्या भुलभूलैयात विद्यार्थी व पालकांना गुंगवून
टाकतात.सर्वसामान्य विद्यार्थी व पालकांना
आपली फसवणूक झाल्याचे खुप ऊशिरा लक्षात येते.हे टाळायचे असेल तर मुलभूत गोष्टींकडे
गांभीर्याने पहायला हवे.प्रवेश घेतेवेळी संस्थेची स्थापना किमान दहा वर्षापूर्वीची
असावी.त्या संस्थेत शिक्षण घेउन बाहेर पडलेल्या विद्यार्थ्याचा सल्ला घ्यावा.
संस्थाचालकांचा गुंडगिरी, दहशत, अरेरावी व लोकांवर अन्याय करून आधी काही संस्था
बंद व गिळंकृत केल्यात काय याचा पूर्वेतिहास तपासून-आठवून पहावा. जाहिरातींचा मारा
करून नसलेली गुणवत्ता असल्याचा भास निर्माण केला जातो आहे.. औषध लावून पिकवलेल्या
फळासारख्या, अशा झगमगीतपणाविषयी साशंक राहणे पालक व विद्यार्थी यांच्या हिताचे
ठरते. न्यायालयाने व शासनाने मान्यताप्राप्त व नियमित प्राचार्यांची नेमणूक करणे संस्थेस
बंधनकारक केले आहे.शिक्षणसंस्थेचा प्रमुख या नात्याने घटनात्मकरित्या
प्राचार्यांची जबाबदारी मोठी असते.विकासाची दिशा ठरवणारा, शिस्तशीर कार्यप्रणाली
राबवणारा, विद्यार्थीहित जपणारा व शिक्षण या मानवी विकासाच्या मुलभूत कल्पनेशी ठाम
राहणारा अशी प्राचार्यांची भुमिका तो जर मान्यताप्राप्त व नियमित असेल तरच पार
पाडता येते. कुटूंबप्रमुखाचेच पाय स्थिर नसतील तर कुटूंबाचा डोलारा डळमळायला
लागतो, हे लक्षात घ्यावयास हवे. पाल्याच्या शिक्षणासाठीची गुंतवणूक ही त्याचे
भविष्य घडवणारी असल्याने प्रवेशावेळी वरील गोष्टींचा सखोल विचार होणे आवश्यक वाटते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा